एटीएममधून पैसे काढल्यास भरावा लागू शकतो एवढा दंड…

0

नवी दिल्ली l एटीएम शुल्काच्या समिक्षेबाबत जून महिन्यांत भारतीय रिझर्व्ह बँकेने एक समिती नेमली होती, आपल्या शिफारशी या समितीने बँकेकडे सोपवल्या आहेत. एटीएममधून ५,००० रुपयांपेक्षा अधिक रक्कम काढल्यास येत्या काही दिवसांत त्यावर तुम्हाला अतिरिक्त शुल्क द्यावे लागू शकते. सध्याच्या पाच मोफत व्यवहारांमध्ये हा नवा नियम समाविष्ट असणार नाही.

मध्य प्रदेशचे एलएलबीसी समन्वयक एसडी माहुरकर यांच्या माहितीनुसार, दहा लाखांपेक्षा कमी लोकसंख्येच्या शहरांमध्ये एटीएममधून व्यवहार वाढवण्यावर समितीने भर दिला आहे.

एकाच वेळी ५,००० रुपयांपेक्षा अधिक रक्कम एटीएममधून काढल्यास २४ रुपये अतिरिक्त शुल्क ग्राहकाला द्यावे लागू शकते. सध्या एटीएममधून पाच मोफत व्यवहार करता येऊ शकतात. त्यानंतर जर त्याच महिन्यात सहावा व्यवहार झाला तर त्यावर ग्राहकाला २० रुपये अतिरिक्त शुल्क द्यावे लागते. आरबीआयने नेमलेल्या समितीच्या शिफारशींनुसार आठ वर्षांनंतर एटीएमच्या शुल्कामध्ये बदल होऊ शकतो.

छोटी-छोटी रक्कम या ठिकाणी जास्त करुन लोक काढतात. समितीने यासाठी नव्या नियमांनुसार छोट्या व्यवहारांनाच मोफत व्यवहारांमध्ये ठेवले आहे. छोट्या शहरांमध्ये दुसऱ्या बँकांच्या एटीएममधून ग्राहकांना प्रत्येक महिन्याला सहा वेळा पैसे काढण्याची सूटही या नव्या नियमामुळे मिळू शकते. सध्या केवळ पाच वेळाच छोट्या शहरांमध्ये पैसे काढता येतात.

एका महिन्यांत एटीएममधून तीन वेळा पैसे काढण्याची सूट मुंबई, दिल्ली आणि बंगळुरू सारख्या महानगरांमध्ये ग्राहकांना आहे. यानंतर चौथ्यांदा पैसे काढल्यास अतिरिक्त शुल्क लागते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here