लष्कराचा मोठा खुलासा l शोपियन चकमकीत मारले गेलेले ‘ते’ तिघे दहशतवादी नव्हते !

0

श्रीनगर l काश्मीरमधील शोपियन जिल्ह्यात झालेल्या कथित चकमकीत तीन दहशतवादी मारले गेल्याची माहिती समोर आली होती. मात्र त्यातून आता नवी माहिती समोर आली आहे. ते तिघे कोणी दहशतवादी नसून मजूर असल्याचे सांगितले जात आहे.

पाकिस्तान आणि चीनसोबत सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर मोठी बातमी समोर आली आहे. या प्रकरणात जवानांनी सशस्त्र दल विशेष अधिकार कायद्याचा वापर करीत मर्यादाभंग केल्याचे पुरावे लष्कराकडे असल्याची बाब शुक्रवारी स्पष्ट करण्यात आली.

दोन महिन्यांपूर्वी 18 जुलैला झालेल्या कथित चकमकीत विशेष कायद्याचा भंग केल्यामुळे या जवानांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आल्याची माहिती लष्कराचे प्रवक्ते कर्नल राजेश कालिया यांनी दिली.

इंडियन एक्सप्रेसने यासंदर्भातील बातमी दिली आहे.शोपियन जिल्ह्यातील अमशिपुरा या भागातील 3 दहशतवाद्यांना ठार केल्याचा दावा लष्कराने केला होता. मात्र मारले गेलेले इम्तियाझ अहमद, अब्रार अहमद आणि मोहम्मद इब्रार हे तरुण जम्मूच्या राजोशी जिल्ह्यातील होते. त्यानंतर ते तेथून बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली होती.

यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी याबाबत तक्रारही दाखल केली आहे. याची माहिती मिळताच लष्कराचे याबाबत चौकशी सुरू केली होती. अखेर याबाबत नेमकी माहिती समोर आली आहे. ही चौकशी 4 आठवड्यात पूर्ण करण्यात आल्याची माहिती प्रवक्त्यांनी दिली आहे.सध्या देशात चीन व पाकिस्तानसोबत सीमेवरुन वाद सुरू आहे.

त्याच्या पार्श्वभूमीवर होती बातमी समोर आली आहे. यानंतर श्रीनगरमध्ये मोठा गोंधळ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.मारले गेलेल्या या तिघांपैकी मोहम्मद याच्या वडिलांनी सांगितलं की, आम्हाला मोहम्मह व त्याच्यासोबतच्या दोघांचेही मृतदेह हवे आहे. त्यांचा काहीही दोष नव्हता..विनाकारण त्यांचा बळी गेला. यासाठी जबाबदार असलेल्यांना फाशी देण्यात यावी, अशी माझी मागणी आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here