उमराण्यात एका तासाच्या अंतरात आणखी एकाला कोरोनाची बाधा;देवळा तालुक्यात कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या २६

0
वेगवान न्यूज/ मनोज वैद्य
दहिवड (७ जुलै)
देवळा तालुक्याच्या चिंतेत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे तालुका प्रशासनाला सायंकाळी ६ वाजता  प्राप्त झालेल्या अहवालात उमराणे येथील एक अहवाल पॉझिटिव्ह आढळून आला होता त्यांनतर परत ७.२० वाजता उमराणे येथील आणखी एक अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची  माहिती तालुका आरोग्याधिकारी डॉ.सुभाष मांडगे यांनी वेगवान न्यूजला दिली आहे.
  ५ जुलै रविवारी उमराणे येथे आढळून आलेल्या ६० वर्षीय कोरोना बाधीत महिलेच्या निकट संपर्कातील उमराणे येथील ४० वर्षीय पुरुषाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर परत त्या महिलेच्या संपर्कातील ७० वर्षीय पुरुषाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे उमराणे येथील कोरोना बाधीत रुग्णांची संख्या ३ वर जाऊन पोहचली असून हे तिघेही रुग्ण एकाच कुटुंबातील आहेत.
  उमराणे येथील आज पॉझिटिव्ह प्राप्त झालेले दोघेही अहवाल त्या महिलेचा ७० वर्षीय पती तर ४० वर्षीय मुलाचा आहे. त्या बाधीत महिलेचा ७० वर्षीय पती नाशिक येथे खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहे तर ४० वर्षीय मुलगा देवळा येथील कोविड केअर सेंटर ला उपचार घेत आहे.

  आता देवळा शहरात १८, खुंटेवाडी येथील १, गुंजाळनगर येथील ३, सरस्वतीवाडी येथील १, उमराणे ३ अशा एकूण २६ कोरोना बाधीत रुग्णांची नोंद देवळा तालुक्यात झाली असून सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर आहे.  स्थानिक प्रशासनाने  उद्या दि. ८ जुलै पासून १२ जुलै पर्यंत गाव करून *जनता कर्फु*  राबविण्याचा निर्णय घेतला असल्याचे समजते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here