अंकिताने सुशांतसाठी घेतला होतो एवढा मोठा निर्णय, मित्रांना आता केला हा खुलासा

0

मुंबईः

बॉलिवूड  सुशांतचा जवळचा मित्र संदीप सिंह यानं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सुशांत आणि अंकिताच्या रिलेशनशिपबद्दल मोठे खुलासे केले आहेत.अभिनेता सुशांत सिंह राजपूत यानं गळफास घेऊन आत्महत्या केली आणि जगाचा निरोप घेतला.अजूनही लोक या धक्क्यातून सावरलेले नाहीत.

 

संदीप म्हणाला, सुशांतच्या जाण्याचा अंकिताला जबरदस्त धक्का बसला आहे. अंकिता सुशांतची फक्त गर्लफ्रेंड नव्हती ती त्याची आईप्रमाणे काळजी घ्यायची. सुशांतच्या आवडीचे जेवण करायची.अंकिताला सुशांतच्या अंतिम संस्कारात सहभागी व्हायचे होते, पण तिची अवस्था बघून कुटुंबीयांनी तिला परवानगी दिली नाही.

अंकिता त्याच्यासाठी एवढी इमोशनल होती की, त्याच्यासाठी तिने करिअर पण सोडायला तयार झाली होती. तिला सिनेमांच्या ऑफर मिळाल्या होत्या त्या तिनं स्वीकारल्या नव्हत्या. एवढंच नाही तर ब्रेकअप नंतर सुद्धा ती नेहमी सुशांतच्या यशासाठी प्रार्थना करत होती. रिया आणि सुशांतच्या लग्नाबाबत बोलताना संदीप म्हणाला, मला अशा कोणत्याही लग्नाचं निमंत्रण नव्हतं. त्यामुळे मला याबाबत काहीच माहीत नाही. मला जे माहीत आहे ते म्हणजे एक वेळ अशी होती की, सुशांतला अंकिताशी लग्न करायचं होतं.’

संदीप म्हणाला, ‘सुशांतच्या अखेरच्या काळात त्याच्यासोबत काही लोकं होती. पण आम्ही दोघंही नेहमी कॉल आणि मेसेजच्या माध्यमातून एकमेकांच्या संपर्कात होतो. पण मला नाही वाटत जेव्हा व्यक्ती असं काही करायचा विचार करतो तेव्हा कोणाला याबाबत काही सांगतो.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here