अजित पवार तुम्ही धुतल्या तांदळासारखे नाही

0

मुंबईः

गेल्यावर्षी राज्यातील सत्तानाट्यामध्ये अजित पवार यांनी भाजपासोबत जाऊन राजभवनावर शपथविधीचा कार्यक्रम उरकला होता. ही घटना का घडली होती याबाबत खासदार संजय राऊत यांनी गौप्यस्फोट केला आहे.

२२ नोव्हेंबर २०१९ रोजीच्या नेहरु सेंटरमधील त्या बैठकीतील चर्चेनंतर अजित पवार यांनी तडकाफडकी निर्णय घेतल्याचे स्पष्टीकरण राऊत यांनी सामनातील रोखठोक या आपल्या सदरातून दिलं आहे.

दरम्यान, यानंतर भाजपा नेते निलेश राणे यांनी यावरून निशाणा साधला आहे. “अजित दादा पवार आता बोला, इतके दिवस जे काही लोकांना वाटतं होत की तुम्ही धुतल्या तांदळासारखे आहात, पण ते तुम्ही नाही हे संजय राऊत यांनीच उघड केलं,” असं निलेश राणे म्हणाले. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून यावर निशाणा साधला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here