चीनने सैन्य मागे घेण्यामागे अजित डोवाल? रविवारी फोनवर चर्चा, सोमवारी माघार

0

गलवान

गलवान खोऱ्यात जे काही झालं त्यावर या दोघांमध्ये चर्चा झाली. तसेच भविष्यात काय घडू शकतं हादेखील चर्चेचा भाग होता. या चर्चेमुळेच चीनचं सैन्य बॅकफूटवर गेलं अशी चर्चा आहे.

जून महिन्यात पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यात चिनी आणि भारतीय सैनिकांमध्ये जी चकमक उडाली त्यात २० भारतीय जवान शहीद झाले. अशा सगळ्या पार्श्वभूमीवर अजित डोवाल यांनी केलेल्या या चर्चेला महत्त्व आहे.

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची आणि चीनचे परराष्ट्र मंत्री तसेच स्टेट काऊन्सिलर वँग ई यांची व्हिडीओ कॉलवर चर्चा झाली. कारण या व्हिडीओ कॉलनंतरच चीन बॅकफूटवर गेला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लेह आणि लडाखमध्ये जाऊन जवानांची भेट घेतली.जो कोणी देशाकडे डोळे वटारुन पाहील त्याचे डोळे काढून घेण्याची क्षमता आमच्यात असल्याचंही ठणकावलं. त्यानंतर भारत चीन सीमेवर असलेल्या तळावरुन घातक अपाचे आणि मिग २९ या विमानांचा कसून सरावही करण्यात आला.

चीनने सीमेवरुन माघार घेतल्याची चर्चा सध्या रंगली आहे. भारतीय सैन्याने सध्या वेट अँड वॉचची भूमिका घेतली आहे. चीनने कोणतीही आगळीक केली तर जशास तसे उत्तर देण्यास आम्ही सज्ज आहोत असं लष्कराने म्हटलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here