एअरटेलची जबरदस्त ऑफर, रिचार्जवर ५० टक्के कॅशबॅक

0

नवी दिल्लीः

इंडियन टेलिकॉम मार्केटमध्ये स्पर्धा जबरदस्त वाढली आहे.  आता भारती एअरटेलकडून युजर्संना प्रीपेड रिचार्ज केल्यास कॅशबॅक ऑफर देत आहे.

खास करून प्रीपेड प्लान्स सोबत कंपन्या अनेक फायदे आपल्या सब्सक्रायबर्संना देत आहे.कंपनीने गेल्या काही दिवसांपासून अनेक ऑफर्स आणले आहेत. ज्यात हायस्पीड डेटा सोबत सर्व नेटवर्क्सवर फ्री कॉलिंगचा फायदा युजर्संना मिळत आहे. कॅशबॅक ऑफर केवळ अॅमेझॉन पे वरून रिचार्ज करणाऱ्या युजर्संना मिळणार आहे.

कॅशबॅकचा फायदा अॅमेझॉन पेच्या मदतीने रिचार्ज करणाऱ्या युजर्संना मिळणार आहे. ही ऑफर केवळ अॅमेझॉन प्राईम मेंबर्ससाठी आहे. प्रीपेड नंबरवरून रिचार्ज केल्यास ५० टक्के किंवा ४० टक्क्यांपर्यंत कॅशबॅक मिळणार आहे.

ही एक लिमिटेड टाइम ऑफर आहे. केवळ ३० ऑक्टोबर पर्यंत वैध असणार आहे. या ऑफरचा फायदा घेण्यसाठी युजर्संना आपल्या अॅमेझॉन प्राईम अकाउंटवरून लॉग इन करावे लागणार आहे. त्यानंतर कॅशबॅक रिवार्ड कलेक्ट करावा लागणार आहे.

एअरटेल प्रीपेड युजर्संना मिळत असलेल्या या ऑफरसाठी वेगळा कोणताही प्रोमो कोड नाही. केवळ अॅमेझॉन प्राईम मेंबर्ससाठी याचा फायदा मिळणार आहे. तेच केवळ रिवार्ड कलेक्ट करू शकतील. वेबसाईटवर टर्म्स अँड कंडिशन्स दिले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here