अहमदनगरःकोपरगाव मध्ये एकाच दिवशी 3जणांना कोरोना लागण

0
वेगवान न्यूज/ संदीप भुसे
कोपरगाव
कोरोनाची लक्षणे आढळल्याने कोपरगाव मध्ये धक्कादायक एकाच  दिवशी 3 जणांची कोरोनो अहवाल पॉझिटिव्ह आले आहे कोपरगाव शहराची कोरोना पॉझिटिव्हची संख्या आता 9 झाल्याने कोपरगाव तालुक्यात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार कोपरगाव तालुक्यात आज ३ जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. यापैकी कोपरगाव शहरातील ओमनगर खडकी रोड येथील दोन पुरुष कोरोना बाधित झाले आहे त्यापैकी एक हे डॉक्टर असून (वय 45 वर्ष) व त्यांचे वडील (वय 72 वर्ष) हे दोघे कोरोना बाधित झाले आहे.
यातील डॉक्टर हे 26 जून रोजी नाशिक येथे जाऊन आले होते. तर मूळचे मुंबई येथील रहिवासी मात्र कोपरगाव तालुक्यातील टाकळी येथे नातेवाईकांकडे ब्राम्हणगाव चौफुली येथे आलेले 46 वर्षीय पुरुष कोरोना बाधित झाले आहे. एकाच दिवशी कोपरगाव तालुक्यात 3 जण कोरोना बाधित झाल्याने त्यात एक डॉक्टर असल्याने कोपरगाव शहरासह तालुक्यात खळबळ उडाली आहे.
कोरोना बाधितांच्या संपर्कात कोण कोण आले त्याचा तपास सुरू असून सदर परिसर सील करून निर्जंतुकीकरण करण्याचे काम प्रशासनाच्या वतीने सुरू आहे. तसेच एकाच दिवशी 3 कोरोना बाधित व्यक्ती आढळल्याने कोपरगाव मध्ये भयभीत वातारवर,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here