सुशांतनंतर आणखी एका टीव्ही अभिनेत्यानं केली आत्महत्या

0

मुंबई :  मनोरंजन विश्वातील आणखी अभिनेत्याने आत्महत्या केली आहे. कन्नड टेलिव्हिजन अभिनेता सुशील गौडा (Actor Susheel Gowda) ने त्याचे होमटाऊन मंड्या (Mandya) यााठिकाणी आत्महत्या केली.अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडला मोठा धक्का बसला होता. या धक्क्यातून त्याचे चाहते सावरले नाहीत, तोपर्यंत ही दुसरी आत्महत्या आहे.

त्याने ‘अंतपूरा’ या रोमँटिक मालिकेमध्ये काम केले होते. मिळालेल्या माहितीनुसार सुशीलने 7 जुलै रोजी आत्महत्या केली. कन्नड इंडस्ट्रीमध्ये नावारूपास येण्यासाठी सुशील प्रयत्नशील होता. त्याच्या आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. त्याच्या जाण्याने टेलिव्हिजन विश्व, त्याचे चाहते आणि कुटुंबीयांसाठी हा मोठा धक्का होता. वयाच्या अवघ्या 30 व्या वर्षी त्याने हे टोकाचे पाऊल उचलले.

आगामी Salaga या चित्रपटामध्ये पोलिसाच्या भूमिकेत दिसणार होता. अभिनेता दुनिया विजय या सिनेमामध्ये मुख्य भूमिकेत असणार आहे. सुशीलच्या आत्महत्येनंतर विजयने दु:ख व्यक्त केले आहे.

सोशल मीडियावर त्याने पोस्ट शेअर केली आहे. त्याने पोस्टमध्ये असे म्हटले आहे की, ‘जेव्हा मी त्याला पाहिले तेव्हा मला तो हिरो मटेरियल वाटला होता. चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच तो खूप लवकर सोडून गेला. कोणतीही समस्या असेल तरी त्याचे उत्तर आत्महत्या करणे असू शकत नाही. मला असं वाटतंय की यावर्षी मृत्यूचे सत्र सुरूच राहील. हे केवळ कोरोना व्हायरसमुळे नाही , लोकांचा विश्वास कमी होत आहे कारण त्यांच्या नोकऱ्या जात आहेत. अशावेळी धीराने राहणे आवश्यक आहे’.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here