चीन-पाकिस्तानचा मोठा कट अमेरिकेने पाडला हाणून,भारताची मैत्री निभावली

0

नवी दिल्ली :

जम्मू काश्मीरमध्ये सक्रीय असलेली दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्‍मद आणि मुंबई हल्ल्यातील आरोपी मसूद अझहरला संयुक्त राष्ट्राने जागतिक दहशतवाद्यांच्या यादीत टाकल्यावर पाकिस्तानने  कट रचला होता. दहशतवादाला समर्थव देण्याच्या मुद्द्यावरून पाकिस्तानने चीनच्या मदतीने भारताला अडकविण्याचा मोठा कट रचला होता. मात्र, हा डाव अमेरिकेने हाणून पाडला आहे.

भारताच्या ४ नागरिकांना आंतरराष्ट्रीय दहशतवादी ठरविण्याचा प्रस्ताव पाकिस्तानने दिला होता. त्यांच्यावर पाकिस्तानमध्ये दहशतवाद पसरविल्याचा आरोप केला होता.

अमेरिकेच्या सुरक्षा परिषदेने शुक्रवारी अधिकृतरित्या भारताला याबाबत कळविले आहे.हा पाकिस्तानचा प्रस्ताव अमेरिका रोखणार असल्याचे कळविण्यात आले आहे. यामध्ये अफगाणिस्तानमध्ये सक्रीय असलेल्या भारतीय कन्स्ट्रक्शन कंपनीचे इंजिनिअर वेनू माधव डोंगरा यांचेही नाव होते.

जर पाकिस्तानला पुन्हा डोंगरा यांना यामध्ये अडकवायचे असेल तर पुन्हा नवा प्रस्ताव सादर करावा लागेल.
पाकिस्तान डोंगरायांच्यावर कारवाई करून मसूद अझहरवरील बंदीचा बदला घेऊ इच्छित होता. मात्र, अमेरिकेमुळे तो पूर्णपणे फसला

भारतीय अधिकाऱ्याने सांगितले की, आम्ही कधीही पाकिस्तानकडून ठोस पुरावे येतील याची अपेक्षा केली नव्हती. अझहरच्या प्रकरणात चीनने पाय आडवा घातला होता. मात्र, त्याची संघटनाच संयुक्त राष्ट्रांनी दहशतवादी घोषित केल्याने चीनलाही माघार घ्यावी लागली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here