लग्नाच्या ९ वर्षांनंतर समजले बायको ‘पुरूष’ आहे म्हणून

0

कोलकाता : तब्बल लग्नाच्या 9 वर्षांनंतर पत्नी स्त्री नसून पुरुष असल्याचे समजल्याने पतीला जबर मानसिक धक्का बसला आहे. तिला कॅन्सर झाल्याने याचा खुलासा झाला आहे. ही पुरुष पत्नी 30 वर्षांची आहे.पश्चिम बंगालच्या बीरभूम जिल्ह्यामध्ये एक अजीब घटना घडली आहे.

ती रुग्ण दिसायला  महिलाच आहे. आवाज, महिलेचे शरीर आदी काही स्त्री सारखेच आहे. मात्र, तिच्या शरिरामध्ये जन्मापासून गर्भाशय आणि अंडाशय नाही. तिला कधी मासिक पाळीही आलेली नाही. हा प्रकार दुर्मिळ असून 22000 लोकांमागे एक असा व्यक्ती आढळतो.

कोलकाताच्या नेताजी सुभाष चंद्र बोस हॉस्पिटलमध्ये तिच्यावर उपचार सुरु आहेत. डॉ. अनुपम दत्ता आणि डॉ. सौमन दास यांनी तपासणी केल्यानंतर महिलेचे खरे रुप समोर आले आहे. डॉक्टरांसह तिचा पतीही शॉक झाला असून त्याचे काऊन्सेलिंगही डॉक्टरांनी सुरु केले आहे.

महिलेच्या पोटाखालील भागामध्ये दुखू लागल्याने तिला हॉस्पिटलला नेण्यात आले होते. यावेळी ती वास्तवात स्त्री नसून पुरुष असल्याचे तपासणीमध्ये समोर आले. तिच्या अंडकोशाला कॅन्सर झाल्याचे निदान झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here