अफगाणिस्तानचे कांदे,भूतानचे बटाटे भारतात…

0

नवी दिल्ली l भूतानमधून लवकरच ३० हजार टन बटाटा भारतात येत आहेत. कांदे आणि बटाटे यांची आवक वाढताच बाजारातील दर नियंत्रणात येतील, असा विश्वास केंद्र सरकारने व्यक्त केला.कांदा आयातीसाठी केंद्र सरकारने अफगाणिस्तान, इजिप्त आणि तुर्कस्तानशी संपर्क केला आहे.

वेगवेगळ्या देशांतून वेगवेगळ्या प्रमाणात मालाची आयात होणार आहे. दिवाळीआधी २५ हजार टन कांदा भारतात येईल.महागाई आटोक्यात आणण्यासाठी भूतानचे बटाटे आणि अफगाणिस्तानचे कांदे भारताने मोठ्या प्रमाणावर आयात करण्याचा निर्णय घेतला आहे.

मागील काही दिवसांत बटाटे आणि कांदे यांचे दर वेगाने वाढत आहेत. दरवाढ आटोक्यात आणण्यासाठी बाजारात मोठ्या प्रमाणावर बटाटे आणि कांद्यांचा पुरवठा करणे आवश्यक होते. ही बाब लक्षात येताच केंद्र सरकारने बटाटे आणि कांद्यांची मर्यादीत आयात करण्याचा निर्णय घेतला.नोव्हेंबर महिन्यात दिवाळी आहे. दिवाळसणाआधीच कांदे आणि बटाटे यांचे दर वेगाने वाढू लागले आहेत. पिकाच्या गुणवत्तेनुसार दरांमध्ये फरक असला तरी अनेक ठिकाणी कांदा ८० रुपये किलो किंवा त्यापेक्षा जास्त दराने विकला जात आहे. तसेच बटाटा ६० रुपये किलो वा जास्त दराने विकला जात आहे.

आयात मालाचा दर जास्त राहू नये यासाठी मर्यादीत काळासाठी आयातशुल्कात कपात करण्यात आली आहे.कांदा आणि बटाटा यांच्यावरील आयातशुल्क १० टक्क्यांवर आणण्यात आले आहे. बाजारात मालाची आवक वाढल्यावर कांदे आणि बटाटे यांचे दर नियंत्रणात येतील, असे केंद्र सरकार सांगत आहे. खासगी व्यापाऱ्यांनी ७ हजार टन कांदा आयात केला आहे.

तसेच केंद्र सरकार आणि नाफेड परस्पर समन्वय राखून कांदा आणि बटाटा यांची आयात करत आहे. दिवाळीआधी २५ हजार टन कांदा भारतात येईल. हा कांदा आल्यावर कांद्याचा दर नियंत्रणात येईल.आयात वेगाने करता यावी यासाठी मर्यादीत काळासाठी कांदा आणि बटाटा आयतीच्या नियमांमध्ये बदल केले आहेत. या बदलांचा सकारात्मक लाभ लवकरच दिसेल, असा विश्वास केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here