अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीनं बायकोच्या आरोपावर घेताल मोठा निर्णय

0

मुंबई-बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकी यांच्या पत्नी वेगवेगळे आरोप करत आहे. या दोघांचं प्रकरण चांगलच गाजल आहे. प्रत्येक आठवड्याला नवाजुद्दीन सिद्दीकी व त्यांची पत्नी यांच्या वादाची चर्चा असते. यामुळे सिद्दिकीचे आयुष्य पती -पत्नीच्या वादात ढवळून निघाले आहे.

त्याची पत्नी आलिया हिने कौटुंबिक हिंसाचाराचा आरोप करत त्याच्याकडे घटस्फोटाची मागणी केली. शिवाय ती सोशल मीडियाद्वारे सातत्याने नवाजुद्दीनवर आरोप करत होती. आलियाने इमेल आणि व्हॉट्स अॅपद्वारे ७ मे रोजी नोटीस पाठवली होती. या नोटीसला आता नवाजुद्दीनने उत्तर दिलं आहे. त्याने आपल्या पत्नी विरोधात मानहानीचा दावा ठोकला आहे.

नवाजुद्दीनचे वकिल अदनान शेख यांनी इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत हा खुलासा केला. ते म्हणाले, “आलियाने केलेले आरोप खोटे आहेत. यामागे नावजुद्दीनला केवळ बदनाम करण्याचा प्रयत्न आहे. पुराव्यांअभावी असे कुठलेही आरोप करणं योग्य नाही. आता आम्ही तिच्याविरोधात कायदेशीर कारवाई करणार आहोत. तिच्यावर आम्ही मानहानीचा दावा ठोकला आहे.”

या दोघांना दोन मुलं आहेत. २०१७ मध्येही दोघांच्या वैवाहिक आयुष्यात चढउतार आले. मात्र अनेकदा त्यांनी घटस्फोटाचा निर्णय मागे घेतल्याचं कळतंय.नवाजुद्दीन आणि आलिया यांच्या लग्नाला दहाहून अधिक वर्षे झाली आहेत. ‘लग्नाच्या एक वर्षानंतर २०१० पासून नवाज आणि माझ्यात मतभेद सुरू आहेत.

मी प्रत्येक गोष्ट सांभाळून घेत होती. मात्र आता माझ्याकडून सहन होणार नाही. ” आलिया यांनी त्यांचं नाव बदलल्याचीही माहिती दिली. एबीपी न्यूज’ला दिलेल्या मुलाखती आलिया म्हणाली, “नवाजशी घटस्फोट घेण्यामागे एक नाही तर अनेक कारणं आहेत आणि ही सगळी कारणं गंभीर आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here