आई-वडिलांना मुलं विचारतात ! आम्ही कसे जन्माला आलो? आई-वडील हे लपवतात? मुलांच्या मनातील ‘त्या’ प्रश्नांची उत्तरं; समजून घ्या

0

मुंबई l गर्भनिरोधक साधनांच्या जाहिराती पाहून मुलांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होतात, वाढत्या वयाबरोबर जर त्यांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरं मिळाली नाही तर ते वाममार्गावर जातात. मुलांना लैंगिक शिक्षण देण्यासाठी पालकांनी जागरूक राहणं आवश्यक आहे. भारतीय समाजात आजही लैंगिक शिक्षणाकडे संकुचित दृष्टीने पाहिलं जातं. पालक सकारात्मक पावलं उचलतात, पण त्यांच्या समोरही प्रश्न असतो की मुलांशी लैंगिक संबंधांविषयी मनमोकळेपणाने कसं बोलावं, कशा पद्धतीने त्यांना याविषयी शिक्षण द्यावे.

लैंगिक शिक्षण वयाप्रमाणे द्या

लहान वयातील मुलांना त्यांच्या गुप्तांगाची माहिती द्या. त्यांना त्याची नावे आणि त्याविषयी पूर्ण माहिती द्या. चांगला स्पर्श आणि वाईट स्पर्श कसा ओळखावा ते शिकवा. मुलं वाममार्गाला जाऊ नयेत म्हणून त्यांना योग्य वयातच लैंगिक शिक्षण द्यायला हवं. तज्ज्ञांच्या मते योग्य वयात आणि योग्य पद्धतीने मुलांना लैंगिक शिक्षण देणं अत्यंत आवश्यक आहे. याची सुरुवात मुलं चार किंवा पाच वर्षांची असतात तेव्हापासून करता येऊ शकते.

आठ वर्ष पूर्ण झालेल्या मुलांसाठी

टीव्ही, इंटरनेट पाहून आठ वर्षे वयापेक्षा जास्त वय असलेली मुले आजकाल खूप समजूतदार व्हायला लागली आहेत. अनेक गोष्टी कळू लागल्या आहेत. अनेकदा या माध्यमांमधून त्यांना चुकीची माहिती देखील मिळते आहे.

म्हणून मुलांच्या लैंगिक व्यवहारांवर लक्ष ठेऊन त्यांना योग्य माहिती देणं ही पालकांची जबाबदारी आहे. myupchar.com च्या मते, मुलं माझा जन्म कसा झाला असा हा प्रश्न विचारतात आणि मग पालक त्याचं उत्तर देणं टाळतात. त्याऐवजी आईच्या पोटात गर्भपिशवी असते त्यात 9 महिने बाळ वाढते आणि मग त्याचा जन्म होतो, असं मुलांना सांगण्यास हरकत नाही.

10 ते 13 वर्षांपेक्षा जास्त मोठ्या असलेल्या मुलांशी चर्चा करा

मूल 10 वर्षे वयाचे होईपर्यंत मुलांना व्यवस्थित लिहायला वाचायला येऊ लागते. ते आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींविषयी जागरूक होतात. या काळात त्यांच्या शरीरातदेखील बदल होऊ लागतो. मुलगा असो की मुलगी पालकांनी या काळात सतर्क असायला हवं. चुकीची संगत मुलांचं आयुष्य उद्ध्वस्त करू शकते, म्हणून पालकांनी लैंगिक संबंधाविषयी त्यांच्याशी सहजतेने बोलायला हवं. रोज वर्तमान पत्रात येणाऱ्या अशा घटनांची चर्चा नाश्ता किंवा चहा घेताना कुटुंबासोबत करायला हवी. ते ऐकून मुलं सतर्क होतात.

15 वर्षांपेक्षा जास्त वयाची मुले

15 व्या वयात त्यांची स्वत:ची वैचारिक क्षमता विकसित झालेली असते. अशा मुलांशी त्यांचे विचार जाणून घेऊन, त्यांना समजवायला हवं. कुठल्या वयात शरीर संबंध ठेवणं योग्य असतं, हे त्यांना सांगा. त्यासंबंधीच्या पोक्सो एक्ट विषयीपण त्यांना माहिती द्या आणि वाममार्गला जाण्यापासून रोखा. myupchar.com च्या अनुसार, याच वयात मुलांना एचआयव्ही, एसटीडी अशा लैंगिक संक्रमण आजाराबाबतही माहिती द्यायला हवी.

वेगवान न्यूज वर प्रकाशित आरोग्य विषयक लेख भारतातील पहिल्या, विस्तृत आणि प्रमाणित वैद्यकीय माहितीचा स्त्रोत असलेल्या myUpchar.com यांनी लिहिलेले आहेत. myUpchar.com या संकेत स्थळासाठी लेखन करणारे संशोधक आणि पत्रकार, डॉक्टरांच्या सोबत काम करून, आपल्या साठी आरोग्य विषयक सर्वंकष माहिती सादर करतात.

myUpchar आणि वेगवान न्यूज यावर प्रकाशित माहिती, त्या माहितीच्या अचूकतेवर, या माहितीच्या परिपूर्णते वर विश्वास ठेवल्याने, तुम्हाला कुठलीही हानी झाली किंवा काही नुकसान झाले तर, त्याला myUpchar आणि वेगवान न्यूज जबाबदार असणार नाही,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here