गुगलपे खाते हॅक करून येवल्यातील छायाचित्रकाराची ८० हजरांचा फसवणूक सायबर पोलिसांत गुन्हा दाखल

0
एकनाथ भालेराव / वेगवान न्यूज
येवलाः
तालुका पारेगाव येथील श्री फोटो चे संचालक पंढरीनाथ अण्णा ढगे यांची गुगल पे च्या माध्यमातून तब्बल ८० हजारांची फसवणूक झाली असून या संदर्भात त्यांनी नाशिक पोलीस अधीक्षक कार्यालयातील सायबर सेल येथे तक्रार दिली असून नाशिक ग्रामीण सायबर सेल याचा शोध घेत आहे
दरम्यान
श्री पंढरीनाथ ढगे हे आपल्या एका मित्राला आपला  दि 27 सप्टेंबर रोजी 9890244237 या  गूगल पे ने पैसे पाठवत होते मात्र सदर ट्रानजेक्शन फेल होते म्हणून त्यांनी गुगल सर्च वर गुगल पे चा 8918327489 ग्राहक सेवा नंबर मिळवला व त्यावर कॉल करून आपली तक्रार नोंदवली मात्र ढगे याना पुन्हा 7602470086  नंबर हुन कॉल आला व गुगल पे ग्राहक सेवा प्रतिनिधी बोलतो असे सांगून या भामट्या ग्राहकसेवा प्रतिनिधी ने  ढगे यांचे गुगल पे खाते हॅक करून  यूपीआय आयडी च्या माध्यमातून 10 हजार चे 8 वेळा स्वतःच्या बँक खात्यात ट्रान्सफर करत  80 हजार रुपये काढून घेतले दरम्यान आपली फसवणूक झाली असे लक्षात येताच पंढरीनाथ ढगे यांनी नाशिक सायबर सेल येते रीतसर तक्रार दिली आहे मात्र नागरिकांनी अशी समस्या आल्यास काळजीपूर्वक ऑनलाइन पैसे देवाण घेवाण चे व्यवहार करावे असे आवाहन नाशिक सायबर सेल तर्फे करण्यात आले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here