सुशांतच्या चाहत्यांसाठी कुटुंबियांचा मोठा निर्णय ! कुटुंबिय सुशांत सिंह राजपूत फाऊंडेशनची स्थापना करणार

0

मुंबई l सोशल मिडीयाच्या माध्यमातून सुशांतच्या आठवणींना उजाळाही दिलाय. सुशांतच्या मृत्यूनंतर पहिल्यांदाच त्याच्या कुटुंबियांकडून एक पत्र प्रसिद्ध करण्यात आलंय.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांच्या आत्महत्येने देशातील अनेकांच्या मनाला चटका लागलेला आहे. तुमच्यासाठी सुशांत सिंह राजपूत पण आमच्यासाठी तो आमचा लाडका गुलशन आहे. प्रत्येक गोष्टीसाठी उत्सुक राहणारा, मोठ-मोठी स्वप्न पाहणारा आणि ती पूर्ण करण्याची त्याची हौस होती.

त्याच्याकडे एक दुर्बिण होती आणि शनी ग्रहाला पाहण्याची त्याला फार आवड होती. आता त्याचं हास्य आमच्या कानावर कधी पडणार नाही हे समजून घेण्यासाठी आम्हाला कित्येक वर्ष जातील. कुटुंबातील कधीही न भरून निघणारी ही पोकळी तो निर्माण करून गेला असल्याची भावूक पोस्ट त्याच्या कुटुंबीयांनी शेअर केलीये.

सुशांतच्या आठवणी जपून ठेवण्यासाठी त्याचं कुटुंबिय सुशांत सिंह राजपूत फाऊंडेशनची स्थापना करणार आहे. या फाऊंडेशन अंतर्गत सुशांतला आवडणाऱ्या कला, विज्ञान आणि क्रीडा क्षेत्रांमध्ये करिअर करू पाहणाऱ्या गरजूंना मदत करण्यात येईल. शिवाय सुशांतच्या पटण्यातील घरात त्याचं स्मारक उभारण्याचा निर्णय घेतलाय. ज्यामध्ये सुशांच्या आवडीची पुस्तकं, दुर्बीण, फ्लाईट सिम्युलेटर या वस्तूंचा संग्रह करून ठेवणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here