मुंबई महापालिकेच्या वर्क ऑर्डरमध्ये ६ कोटींचा घोटाळा केला ,पाटील यांचा आरोप

0

मुंबई

राज्य सरकार व मुंबई महापालिकेच्या वतीनं करोना प्रसार रोखण्याबरोबर रुग्णांच्या उपचारासाठी विविध उपाययोजना केल्या जात असल्याचं दिसून येत असून, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महापालिकेनं काढलेल्या वर्क ऑर्डरमध्ये ६ कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा खळबळजनक आरोप केला आहे.राज्यात करोनाचा शिरकाव झाल्यापासून देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत रुग्णांची संख्या मोठी आहे. सध्याही मुंबईतील रुग्णसंख्येची वाढ झपाट्यानं होत आहे.

चंद्रकांत पाटील यांनी यासंदर्भात एक ट्विट केलं आहे. “मुंबईत करोनानं प्रचंड थैमान घातलं आहे. मुंबईची परिस्थिती दिवसेंदिवस नियंत्रणाबाहेर चालली आहे. एवढे मोठे संकट असताना मुंबईतील प्रशासन हे भ्रष्टाचार करण्यात मग्न आहे.

गोरेगाव येथील नेस्को मैदानावर करोनाग्रस्तांसाठी उभारण्यात आलेल्या कोविड सेंटरमध्ये कोट्यवधींचा घोटाळा झाल्याचं समोर आलं आहे. कोविड सेंटरसाठी लागणाऱ्या तब्बल २३ वस्तूची ११ कोटी रुपयांची वर्क ऑर्डर महापालिकेनं काढली असून, त्यात तब्बल ६ कोटींचा घोटाळा करण्यात आला आहे.

कोविड सेंटरचं काम कंपन्यांच्या सीएसआर फंडातून होणार असल्याचं महापालिकेनं सुरूवातीला सांगितलं होतं, पण प्रत्यक्षात महापालिकेनं त्यासाठी ११ कोटी रूपयांची वर्क ऑर्डर दिली असल्याचं उघडकीस आलं आहे. कोविड सेंटरसाठी लागणाऱ्या वस्तू या ३ महिने भाडेतत्वावर घेण्याचा निर्णय महानगरपालिकेने घेतला. मात्र त्यासाठी मोजलेली रक्कम ही त्या वस्तूंच्या प्रत्यक्ष किंमतीपेक्षा जास्त असल्याचे उघडकीस आले.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here