4 वर्षांच्या मुलीवर बलात्कार,हाथरस पुन्हा हादरले !

0

नवी दिल्ली l हाथरस प्रकरण ताजे असतांना पुन्हा हाथरसजवळील गावात धक्कादायक प्रकार समोर आला आहे.हाथरसमध्ये झालेल्या सामुहिक बलात्काराच्या घटनेने देशभरात संताप व्यक्त करण्यात आला होता.एका चार वर्षांच्या मुलीवर 9 आणि 12 वर्षांच्या दोन मुलांनी बलात्कार केल्याची माहिती पोलिसांनी दिली.या घटनेने हाथरस पुन्हा हादरले आहे.

त्या दोन मुलांना ताब्यात घेण्यात आले असून दोघेही अल्पवयीन असल्याने कायद्यानुसार पुढील कारवाई येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.पीडित मुलीच्या वडिलांनी गुरुवारी घटनेची माहिती दिल्यानंतर तक्रार दाखल करून मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे.

तसेच मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. अल्पवयीन मुलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अल्पवयीन मुलांबाबत असलेल्या कायद्यानुसार पुढील प्रक्रिया सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.हाथरसमध्ये गेल्या महिन्यात दलित तरुणीवर झालेल्या सामुहिक बलात्कारानंतर तिचा मृत्यू झाला होता. या घटनेने देशभरात संताप व्यक्त झाला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here