सटाणा शहरासह तालुक्यात ४ कोरोना रुग्ण पॉझिटिव्ह

0

वेगवान न्यूज / गणेश सोनवणे

सटाणाः

आज सायंकाळी आलेल्या अहवालात सटाणा शहरातील ०३ पॉझिटिव्ह तर नामपुर येथे ०१ पॉझिटिव्ह रुग्ण  आढळून आले आहे.

सटाणा शहरातील महात्मा गांधी रस्त्यावर दि.५ जुलै रोजी लग्नसमारंभात आढळलेल्या दोन बाधित पती-पत्नीच्या संपर्कातील ४५ वर्षीय महिला आणि ५५ वर्षीय पुरुष तर काळू नानाजी नगरमधील १७ वर्षीय मुलीचा अहवाल आज पॉझिटिव्ह आला आहे.

व नामपुर येथील ३२ वर्षीय युवकाचा अहवालही आज पॉझिटिव्ह आला आहे.

काल ४० संशयितांचे अहवाल घेतले होते. त्यापैकी आज ०३ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती प्रांत अधिकारी विजयकुमार भांगरे यांनी दिली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here