नाशिक बागलाणमध्ये आदिवासी वस्ती सुधारणा योजनेंतर्गत 36 गावांना 3 कोटी 81 लाखांची कामे !

0

वेगवान न्यूज / गणेश सोनवणे
सटाणा l आदिवासी विकास विभागाच्या ठक्कर बाप्पा आदिवासी वस्ती सुधारणा योजनेंतर्गत बागलाण तालुक्यातील छत्तीस गावांना सुमारे 3 कोटी 81 लाख रुपयांची कामे मंजूर झाली असल्याची माहिती आमदार दिलीप बोरसे यांनी दिली .

ठक्कर बाप्पा आदिवासी वस्ती सुधारणा योजनेंतर्गत बागलाण तालुक्यातील 105 गावांसाठी शासनस्तरावर प्रस्ताव सादर करण्यात आले होते .पहिल्या टप्प्यात सुमारे छत्तीस गावांना विविध विकास कामांना मान्यता देण्यात आली आहे .त्यासाठी सुमारे 3 कोटी 81 लाख रुपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आली असुन त्या पैकी 2 कोटी 71 लाख रुपयांचा निधी संबधित विभागाला वितरीत करण्यात आला असल्याचे आमदार बोरसे यांनी सांगितले .या मंजूर कामांमध्ये आदिवासी वस्तींसाठी पाणीपुरवठा योजना तसेच भूमिगत गटार बांधकामाला प्राधान्य दिले असल्याचे आमदार बोरसे यांनी स्पष्ट केले .त्यामध्ये तालुक्यातील आखतवाडे ,निताणे ,नवी शेमळी ,जुनी शेमळी,डांगसौंदाणे ,माळीवाडे ,मळगाव खुर्द येथील आदिवासी वस्तींसाठी पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली आहे .तर देवठाण दिगर ,देवळाणे येथे पाण्याच्या टाकीचे बांधकाम व जायखेडा येथील लाहीच्या टेकडी वरील आदिवासी वस्तीसाठी पिण्याच्या पाण्याची टाकी व पाईप लाईनचे काम मजूर करण्यात आले आहे.

रातीर ,ब्राम्हणपाडे ,टेंभे वरचे ,बिजोरसे ,फोपीर ,गोळवाड (भीमनगर ),बोरदैवत ,किकवारी खुर्द ,तळवाडे दिगर ,बाभुळणे ,पठावे दिगर ,बोऱ्हाटे ,मोरकुरे ,साल्हेर (पायरपाडा ) येथे सभामंडप व सामाजिक सभागृह बांधकामाला मजुरी देण्यात आली आहे.मुंगसे (विजयनगर ) येथील आदिवासी वस्तीमध्ये मोरी बांधकाम मंजूर करण्यात आले आहे .मुंजवाड ,वनोली ,पिंपळदर व आव्हाटी येथे दफनभूमीसाठी कंपाऊंड बांधकाम मंजूर करण्यात आले आहे.

भूमिगत गटारीही मंजूर …..

आदिवासी वस्तींमध्ये सांडपाण्याचे व्यवस्थापन होऊन स्वच्छता राखण्याच्या दुष्टीने भूमिगत गटार बांधकामाला प्राधान्य देण्यात आले आहे .या योजनेंतर्गत वाघळे ,उत्राणे ,वाडीपिसोळ ,भडाणे ,रामतीर ,कुपखेडा ,भिलवाड येथे भूमिगत गटार बांधकामाला मजुरी देण्यात आली आहे .याकामामुळे स्वच्छ भारत अभियानाला हातभार लागणार असल्याचे आमदार बोरसे यांनी सांगितले .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here