पाकिस्तानचे 250-300 दहशतवादी भारतात घुसखोरी करण्याच्या तयारीत…

0

नवी दिल्ली l पाकिस्तानमधील जवळपास 50 टक्के दहशतवादी तळ (लाँचिंग पॅड) सक्रीय झाले आहेत. पाकव्याप्त काश्मीरमधील या दहशतवादी तळांवरील अनेक दहशतवादी सध्या भारतात घुसखोरी करण्याच्या तयारीत आहेत. पाकिस्तानकडून होणाऱ्या सातत्यपूर्ण शस्त्रसंधी उल्लंघनाच्या पार्श्वभूमीवर सीमेवर अनेक दहशतवादी घुसखोरीच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे. पाकिस्तान व्याप्त काश्मीरमधील या दहशतवादी तळांमध्ये अलबदर, लश्कर-ए-तोय्यबा आणि जैश-ए-मोहम्मद अशा अनेक दहशतवादी संघटनांचा समावेश आहे.

या दहशतवादी संघटनांचे अनेक सदस्य भारतीय सीमेत घुसखोरी करण्याचा सातत्याने प्रयत्न करत आहेत. पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन करुन दहशतवाद्यांना सीमेवरुन घुसखोरी करण्यात मदत केली जात आहे. जम्मू काश्मीरमध्ये सातत्याने होणाऱ्या सैन्य कारवाईनंतर पाकिस्तानमधून नव्या दहशतवाद्यांना भारतात पाठवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

जीओसी 19 इन्फ्लेमेट्री डिव्हिजन, बारामूलाचे मेजर जनरल विरेंद्र वत्स यांनी सांगितले, “आम्हाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पाकिस्तान व्याप्त काश्मीरमध्ये तयार करण्यात आलेले हे दहशतवादी तळ पूर्णपणे शस्त्रसज्ज आहेत. या तळांवर जवळपास 250-300 दहशतवादी असल्याचा अंदाज आहे.”

कुपवाड्यात दोन दहशतवादी ठार

दरम्यान,उत्तर काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यात नौगाम सेक्टरच्या हंदवारा येथे भारतीय सैन्याने दहशतवाद्यांचा मोठा डाव उधळला. सैन्याने केलेल्या कारवाईत दहशतवाद्यांचा घुसखोरीचा मोठं नियोजन हाणून पाडण्यात आला. यात दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं. सैन्याने दिलेल्या माहितीनुसार प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर टुटमार गली भागात संशयास्पद हालचाली निदर्शनास आल्या.यानंतर सैन्याने केलेल्या कारवाईत दोन दहशतवाद्यांचा खात्म करण्यात आला. त्यांच्याकडून 2 एके-47 आणि अन्य शस्त्रास्त्रं जप्त करण्यात आले. या चकमकीनंतर सैन्याने शोधकार्य सुरु केलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here