नाशिक जिल्ह्यात 5 जुलैला सांयकाळ पर्यंत निघाले 211 कोरोना पाॅझिटिव्ह,सात जणांचा मृत्यू

0

वेगवान न्यूज 

नाशिकः नाशिक जिल्ह्यात आज दि. 5 जुलै ला सांयकाळी 6ः45 वाजेच्या दरम्यान जो अहवाल प्राप्त झाले आहे, त्यानुसार जी आकडेवारी मिळाली ती खालील प्रमाणे आहे. दर तासाला नवीन कोरोना बाधित रुग्ण निघत असल्यामुळे आकडेवारी वाढत असते. याची वेगवान न्यूजच्या प्रेक्षक -वाचकांनी नोंद घ्यावी.

आज नाशिक ग्रामीण मध्ये 56 कोरोना पाॅझटिव्ह 6 वाजे पर्यंत आढळून आले आहे. तर नाशिक शहरामध्ये 151 कोरोना पाॅझिटिव्ह आढळून आले आहे. तसेच मालेगाव महानगर पालिका हद्दीमध्ये 4 कोरोना पाॅझिटिव्ह आढळून आले आहे.

नाशिक ग्रामीण मध्ये 2 जणांचा मृत्यू झालायं तर नाशिक शहरात 5 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे आज जिल्ह्यात 7 जणांचा मृत्यू झाला असून मयताची संख्या 277 वर जाऊन पोहचली आहे. सध्या पाॅझिटिव्ह उपचार घेत असलेल्या रुग्णाची संख्या  2062 गेली आहे. तर उपचार घेत असलेले रुग्ण संख्या 2409 इतकी आहे.

नवीन 662 रुग्ण आज विविध रुग्णालयात दाखल झाले आहे. सात वाजे पासून पुढे जे अपडेट येईल त्यामध्ये पुन्हा कोरोना  रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे जेंव्हा जेंव्हा आम्हाला रुग्ण वाढीचे अपडेट  मिळत असते तेंव्हा आम्ही नवीन बातमीतून दर तासाचे कोरोना अपडेट देत असतो त्यामुळे इतर  आकडेवारीत आपल्या फरक दिसून येत असेल याची वाचकांनी नोंद घ्यावी.

आपल्या शहरातील कोरोना पाॅझिटिव्ह एरिया नुसार माहिती कळण्यासाठी आमचे वेगवान न्यूज पेज लाईक करा या लिंकवरुन 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here