रायगडःसुधागड तालुक्यात पाली शहरात आणखीन कोरोनोचे 2 रूग्ण आढळले

0

वेगवान न्यूज / राजू शेख

रायगडः

कोरोनोचा उद्रेक हा आता शहर पाठोपाठ  गाव खेडयात दिसु लागलं आहे,रायगड जिल्ह्यात दिवसेंदिवस रुग्णामध्ये वाढ होताना दिसत आहे,रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील पाली शहरात दिनांक 27 रोजी एक व्यक्ति कोरोनो पॉजिटीव्ह आढळुन आला होता.

त्याच पाठोपाठ आज दिनांक 1रोजी सदर व्यक्ती ची आई व पत्नी ला देखील कोरोनो ची लागणं झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे या तीन्ही व्यक्तीवर तालुक्यातील वावळोली येथील कोविडं सेंटर मधे उपचार सुरू आहे याचं बरोबर सदर व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या जवळील व्यक्ती ना ही कोविड सेंटर मध्ये ठेवण्यात आले आहे.

याचं पार्श्वभूमीवर दिनांक 28 पासून 1 जुलै पर्यंत पाली व्यापारी संघटना आणि ग्राम पंचायत पाली च्या वतीने शहरात 4 दिवस कडेकोट बंद पालण्यात आलं होते,परंतु आज दिनांक 1 रोजी त्याच व्यक्तीची पत्नी आणि आई यांचा कोरोनो अहवाल देखील पॉजिटीव्ह आल्याने हे लॉक डाऊन वाढण्याची संभावना आहे.

या करिता आज सायंकाळी तालुक्यातील तहसील येथे बैठक घेऊन या संदर्भात घोषणा करण्यात येईल,कोरोनो च्या काळात प्रशासन आवश्यक त्या उपाययोजना करत आहे तरी या काळात नागरिकांनी सुध्दा सुरक्षित राहून प्रशासनाने दिलेल्या सर्व नियमांचे पालन करावे तथा सहकार्य करावे असे आव्हान तालुक्यातील जनतेला तहसीलदार श्री. दिलिप रायन्नावर साहेब यांनी केले आहे.

तसेच ग्राम पंचायत पाली कडून ही नागरिकानी विना कारण घरातून बाहेर न पडण्याचे व ग्राम पंचायत कडून दिले गेलेल्या सर्व नियमाचे तसेच गर्दी ठिकाणी न जाण्याचे सोशल डेस्टेनसी चे पालन करण्याचे आव्हान शहरातील नागरिकांना करण्यात आले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here