हिंदुस्थानला व्होडाफोनने दिला 22 हजार कोटी रुपयांचा फटका !

0

नवी दिल्ली l हिंदुस्थानच्या निर्णयाला मोठा फटका बसला आहे.व्होडाफोन समूहाने हिंदुस्थान सरकारविरोधातील सुमारे 22,100 कोटी रुपयांच्या कर प्रकरणाचा खटला हेगच्या आंतरराष्ट्रीय न्यायालयात जिंकला आहे.

हेग मधल्या कायमस्वरुपी आंतरराष्ट्रीय लवादाने हिंदुस्थानी प्राप्तीकर खात्याने कररचनेसाठी समान न्यायी पद्धत अवलंबली नसल्याचे ताशेरेही ओढले. या लवादाने या खटल्याच्या एकूण खर्चापोटी हिंदुस्थानने व्होडाफोनला 43 लाख पौंड (सुमारे 40.30 कोटी रुपये) इतकी नुकसानभरपाई देण्याचेही आदेश दिले आहेत.

हेगच्या आंतरराष्ट्रीय लवादाने या प्रकरणासंदर्भातील निकाल देताना, ‘व्होडाफोनवर हिंदुस्थान सरकारने लागू केलेलं करदायित्व हे हिंदुस्थान व नेदरलँड या उभय देशांतील गुंतवणूक कराराचा भंग करणारे आहे,’ असे म्हटले आहे.

या वृत्तानंतर शुक्रवारी व्होडाफोन आयडियाच्या शेअरचा भाव मुंबई शेअर बाजारात 12 टक्क्यांनी वधारला व 10.20 रुपये प्रति शेअर झाला. आता हिंदुस्थान सरकारने व्होडाफोनला 40.30 कोटी रुपये द्यावेत असा आदेशही न्यायालयानं दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here