बीड – बीड जिल्ह्याला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. काल प्रलंबीत असलेल्या पैकी 13 जण पॉझिटीव्ह निघाल्याची माहिती हाती येत आहे.
बीड जिल्ह्यात आज सकाळपर्यंत 16 जण पॉझिटीव्ह होते. आता दुपारी त्यात 13 जणांची भर पडली आहे. हे सर्वजण कवडगाव थडी येथील पॉझिटीव्हच्या संपर्कात आले असल्याची माहिती आहे. ट्रव्हल्सच्या प्रवासातून त्यांना हा कोरोना झाला असल्याचे आरोग्य विभागातील सुत्रांनी सांगितले. त्यांचे कॉन्टॅक्ट ट्रेस झाल्यानंतर त्यांना प्रशासनाने माजलगावच्या रुग्णालयात दाखल करून क्वारंटाईन केले होते. या वृत्ताला आरोग्य विभागातील जबाबदार अधिकार्यांनी दुजोरा दिलेला आहे.